Pimpri : संपादणूक (नॅस) चाचणीत विद्यार्थ्यांची शुक्रवारी परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NAAC
पिंपरी : संपादणूक (नॅस) चाचणीत विद्यार्थ्यांची शुक्रवारी परीक्षा

पिंपरी : संपादणूक (नॅस) चाचणीत विद्यार्थ्यांची शुक्रवारी परीक्षा

पिंपरी - शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅस) शहरातील 657 शाळापैकी 42 शाळांमध्ये केले जाणार आहे. यात महापालिकेच्या 9 शाळांचा समावेश आहे. त्यासाठी १२ नोव्हेंबरला होणाऱ्या सर्व्हेक्षणात एक हजार 260 विद्यार्थी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी), केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(सीबीएसई) यांच्यातर्फे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांपासून ते खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाते. यासाठी यंदा शहरातील 657 शाळांपैकी 42 शाळांची निवड केली आहे. तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येईल.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांचा पिंपरीत आकांत

नऊ शाळांची निवड

महापालिकेच्या वाकड, चिंचवडगाव, पिंपळे गुरव, खराळवाडी, थेरगाव, आकुर्डी उर्दू, विकासनगर किवळे, निगडी श्रमिकनगर, थेरगाव मुले या नऊ माध्यमिक शाळांची निवड केली आहे.

5 क्षेत्रीय अन्वेषकांची निवड

यासाठी महापालिकेचे 5 क्षेत्रीय अन्वेषक शाळांवर जाऊन विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करणार आहेत. यामध्ये पर्यवेक्षक विलास पाटील, रजिया खान, अनिता जोशी, सुनील लांघी आणि राजेंद्र कानगुडे यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भाषा, गणित, विज्ञान, परिसर अभ्यास, सामाजिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयासाठी विद्यार्थ्यांची चाचणी घेणार आहेत.

'राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या चाचणीची तयारी राष्ट्रीय स्तरावर पूर्ण झाली असून, त्या संदर्भातील प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी शाळांना परिपत्रकद्वारे आवश्यक सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व शाळांनी तयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रत्यक्ष शाळेत हजर राहण्यास सांगितले आहे.'

- स्मिता गौड, प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग

loading image
go to top