
वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना नागरिकांच्या माहितीसाठी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भौगोलिक रचनेत कोणताही बदल झाला नसल्याची माहिती नगरपंचायतीचे प्रशासक तसेच मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.