वाकड : उद्यानाच्या नामकरणावरून राडा, निषेध अन मुंडन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन सुरु असताना भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ह्या नामकरणाच्या विरोधात निषेध
naming of the park inauguration ajit pawar protest Shaving head wakad pune
naming of the park inauguration ajit pawar protest Shaving head wakad pune sakal
Updated on

वाकड : येथील उद्यानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन सुरु असताना भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ह्या नामकरणाच्या विरोधात निषेध करीत अजित पवारांना याबाबत निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करीत ताब्यात घेतले त्यामुळे आंदोलकांची पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली. या प्रकारामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र उदघाटन उरकल्याने पोलिसांनी आंदोलकांना सोडताच चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे यांनी उद्यानाच्या प्रवेश द्वाराजवळ मुंडन करत महापालिका प्रशासनाचा व नामकरणाचा निषेध केला.

यावेळी कलाटे कुटुंबीय यांच्यासह माजी नगरसेवक विनायक गायकवाड, पै. विशाल कलाटे, राम वाकडकर, श्रीनिवास कलाटे, कुणाल व्हावळकर, आकाश बोडके, सिध्दार्थ गायकवाड, रणजित कलाटे व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाचा निषेध करत घोषणाबाजी केली.पुण्यातील सेलेबरी पार्कच्या धर्तीवर वाकड येथील उद्यानाचे नाव रद्द करून उपमुख्यमंत्र्यांनी दुटप्पी भूमिका न घेता आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी स्नेहा कलाटे यांनी केली. संतोष कलाटे म्हणाले की माझे आजोबा मालक उर्फ स्व. अनंता कलाटे हे जमिनीचे मूळ मालक असून कै. तानाजीभाऊ कलाटे या नावाऐवजी मूळ जमीन मालकाचे योगदान पाहता कै. मालक उर्फ अनंता कलाटे नाव उद्यानाला देण्याची आमची मागणी होती.

तसा प्रभाग कार्यालयात ठरावही पारित झाला होता. मात्र नामकरणाची प्रक्रिया छुप्या पद्धतीने झाली. कोणालाही विश्वासात न घेता चुकीचा आणि बेकायदेशीर निर्णय घेण्यात आला. या गैर कारभाराचा सनदशीर मार्गाने लोकशाही पद्धतीने निषेध करताना पोलीस बळाच्या जीवावर आमचे आंदोलन दडपण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देखील देऊ दिले नाही. ही लोकशाहीची क्रूर हत्या असू या सर्व गैरकारभाराच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. याबाबत राहुल कलाटे म्हणाले या जमीनिचे आजवर पाच सहा मालक झाले. मात्र नामकरणाबाबत कुठलाही प्रस्ताव अथवा मागणी झाली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com