
पंतप्रधान येणार देहू नगरीत; मोदींच्या हस्ते होणार मंदिराचं लोकार्पण
देहू : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच श्री क्षेत्र देहू नगरीत येणार आहेत, १४ जून रोजी त्यांचा हा दौरा असेल. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरांचं मोदींच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पण होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांचं देहूत आगमन होणार असल्याची माहिती भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी ट्विटद्वारे दिली. (Narendra Modi to visit Dehu Sant Tukaram Maharaj temple will be inaugurated by PM)
भोसले यांनी ट्विट केलं की, "महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहु येथे येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी करणार जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण"
हेही वाचा: पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचा जिर्णोद्धार व्हावा; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भूमिपूजन केलं होतं. या पालखी मार्गांचा विकास होणार असल्यानं वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांच्या वंशजांच्या शिष्टमंडळानं मार्च महिन्यात दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते तसेच त्यांना संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकर्पणासाठी देहू येण्याच निमंत्रण दिलं होतं.
हे निमंत्रण पतंप्रधान नरेंद्र मोदींनी स्विकारलं असून येत्या १४ जून रोजी ते देहू नगरीत येणार आहेत, अशी माहिती तुषार भोसले यांनी दिली आहे.
Web Title: Narendra Modi To Visit Dehu Sant Tukaram Maharaj Temple Will Be Inaugurated By Pm
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..