

Narhe Dehu Road
sakal
पुणे : नऱ्हे ते देहूरोड या उन्नत (एलिव्हेटेड) मार्गाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. तसेच प्रकल्प अहवालात बदल करून पुन्हा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे.