सुशांतसिंग राजपूतच्या 'पवना' येथील फार्महाऊसची एनसीबीकडून झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मंगळवारी (ता. 8) त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला अटक केली.

लोणावळा : अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मंगळवारी (ता. 8) त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला अटक केली. त्यानंतर एनसीबीच्या एका टीमने सुशांतसिंगच्या पवना (ता. मावळ) येथील फार्महाऊसची झाडाझडती घेतली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुशांतसिंगच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवीन धागेदोरे हाती लागत आहेत. सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर पवना धरणाच्या जलाशयालगत असलेले त्याचे हॅंगआऊट व्हीला नामक फार्महाऊस ही चर्चेत आले आहे. सुशांतसिंगच्या मृत्युपूर्वी त्याच्या पवना येथील फार्महाऊसवर त्याचे कुटुंब, रिया चक्रवर्ती तसेच बॉलीवुडमधील अनेक सेलिब्रिटींच्या अनेकदा पार्ट्या झडल्या माहितीही उघड झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुशांतसिंगच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना काही धागेदोरे हाती लागतात का, यासाठी मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हॅंगआऊट व्हीलावर धाड टाकली. मात्र, छाप्यात नेमकी कोणती माहिती हाती लागली, याचा तपशील मात्र मिळू शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCB inspects Sushant Singh Rajput's farmhouse at Pavana maval