esakal | कॅनडाहून पोस्टाने मागविला गांजा; लोणावळ्यात एनसीबीची मोठी कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

कॅनडाहून पोस्टाने मागविला गांजा; लोणावळ्यात एनसीबीची मोठी कारवाई
  • कॅनडातून लोणावळ्यात पार्सल
  • एनसीबीची कारवाई, दोन जणांना अटक 

कॅनडाहून पोस्टाने मागविला गांजा; लोणावळ्यात एनसीबीची मोठी कारवाई

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लोणावळा : येथील पोस्ट ऑफिसमध्ये कॅनडा येथून पार्सलमधून आलेले सुमारे 55 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) पोस्ट ऑफिसमध्ये छापा टाकत ही कारवाई केली. याप्रकरणी श्रीमय परेश शहा (वय 26, रा. अहमदाबाद, गुजरात, सध्या रा. नवी मुंबई) व ओंकार जयप्रकाश तुपे (वय 28, रा. नेरुळ, नवी मुंबई) या दोघांना अटक केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोस्टाच्या माध्यमातून अमली पदार्थांची लोणावळ्यातून तस्करी होत असल्याचे माहिती एनसीबीच्या पथकाला दोन दिवसांपूर्वी मिळाली होती. नांगरगाव, लोणावळा येथील पत्त्यावर कॅनडाहून पोस्टाने पार्सल मागविण्यात आले होते. शनिवारी (ता. 17) एनसीबीच्या पथकाने लोणावळा पोस्ट ऑफिसमध्ये छापा टाकून कॅनडाहून मागविलेले पार्सल ताब्यात घेतले. पार्सलमधून सुमारे एक किलो 36 ग्रॅम वजनाचा मारीजुआना हा अमली पदार्थ, क्‍युरेटेड गांजा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत अंदाजे 50 ते 55 लाख रुपये असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी मिळाली माहिती... 
मरीजुना, गांजा, बड आदी प्रकारचे अमली पदार्थ कॅनडामार्गे मुंबई, गुजरात, अहमदाबाद भागात येत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. हे अमली पदार्थ ताब्यात घेण्यासाठी आलेल्या शहा व तुपे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नेरुळ येथून अजून 74 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 50 ते 55 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे पार्सल लोणावळ्यात कसे व कोणाच्या पत्त्यावर आले, यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का? हे पार्सल कोठून पोस्ट केले गेले होते, अमली पदार्थाची कोणास विक्री करायची, अहमदाबाद व मुंबईतील संभाव्य ग्राहक कोण? आदी प्रश्नांचा एनसीबीचे पथक शोध घेत आहे. या पार्सलची एनसीबीला आधीच माहिती होती. यासंदर्भात एनसीबीच्या पथकास आवश्‍यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती पोस्ट मास्तर पी. एस. मेश्राम यांनी दिली.