एनडीआरएफची पुण्यासाठी १४ पथके राखीव - सर्वेशकुमार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NDRF reserves 14 squads for Pune Sarvesh Kumar pimpri

एनडीआरएफची पुण्यासाठी १४ पथके राखीव - सर्वेशकुमार

पिंपरी : ‘‘आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफचे दल सज्ज आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये घटनास्थळी पोचून रेस्क्यूसाठी दल तयार असेल. पुण्यासाठी १४ पथके राखीव ठेवली असून ९७ बोटी तैनात आहेत,’’ असे एनडीआरएफचे निरीक्षक सर्वेशकुमार उपाध्याय यांनी सांगितले.

शहरातील पूर आपत्ती व्यवस्थापन, पूर नियंत्रण उपाययोजनांसंबधी महापालिका प्रशासक राजेश पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत पूर आपत्ती व्यवस्थापन आणि पूर नियंत्रण कृती आराखड्याबाबत चर्चा झाली. आराखड्यानुसार विविध विभागांकडे सोपविलेल्या कामकाजाचा आढावा आणि नियोजनाबद्दल माहिती घेतली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात बैठक झाली. आदींसह पद्माकर घनवट, अजयकुमार यादव उपस्थित होते.

महापालिका प्रशासक पाटील म्हणाले...

  • पावसाळ्यात पूर परिस्थिती सहजतेने हाताळण्यासाठी सर्व विभागांनी अंतर्गत समन्वय ठेवावा

  • नदीतील पाणी पातळी वाढू लागल्यानंतर लगेचच सर्व यंत्रणा कार्यान्वित होणे गरजेचे आहे

  • पूरस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना तयार करून जनजागृती करा

  • पाणी कोठेही तुंबणार नाही, याची काळजी घ्यावी. नदीकाठच्या लोकवस्तीवर लक्ष ठेवा

  • दुर्घटना टाळण्यासाठी सातत्याने पाहणी करावी. पूरग्रस्तांसाठी अन्न, निवासाची व्यवस्था करावी

पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती नेहमी उद्भवते, अशा ठिकाणी नागरिकांना प्रशिक्षण द्यावे. आपत्ती काळात त्वरित संपर्कासाठी विविध आवश्यक विभागांचे व यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवावेत. धोकादायक वृक्षांची वेळेत छाटणी व नालेसफाई करावी.

-राजेश पाटील

Web Title: Ndrf Reserves 14 Squads For Pune Sarvesh Kumar Pimpri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top