मावळात आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढली 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. शुक्रवारी तब्बल ५७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. शुक्रवारी तब्बल ५७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर धामणे येथील कोरोनाबाधित ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या एक हजार ६०८, तर मृतांची संख्या ५९ झाली आहे. आतापर्यंत एक हजार २०४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी ५३ जणांना घरी सोडण्यात आले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ५७ जणांमध्ये तळेगाव येथील सर्वाधिक २५, लोणावळा येथील नऊ, कामशेत, सोमाटणे व वराळे येथील प्रत्येकी चार, वडगाव व इंदोरी येथील प्रत्येकी तीन, तर टाकवे बुद्रुक, शिरगाव, धामणे, बेबडओहळ व सुदुंबरे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ६०८ झाली असून, त्यात शहरी भागातील ८३२ व ग्रामीण भागातील ७७६ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ५३४, लोणावळा येथे १७८ तर वडगाव येथील रुग्ण संख्या १२० झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तालुक्यात आतापर्यंत ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक हजार २०४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी ५३ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात सध्या ३४५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २२४ जण लक्षणे असलेले व १२१ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २२४ जणांपैकी १३५ जणांमध्ये सौम्य, तर ७० जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १९ जण गंभीर आहेत. सध्या ३४५ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 1038 coroa patients were found in maval on friday 21 august 2020