पिंपरी-चिंचवडमध्ये आज कोरोनाबाधितांचा आकडा हजारावर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

कोरोना संसर्ग झाल्याने शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 20 जणांचा आज मृत्यू झाला.

पिंपरी : कोरोना संसर्ग झाल्याने शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 20 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात शहरातील 15 व शहराबाहेरील पाच जणांचा समावेश आहे. आजपर्यंत एकूण 751 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात आज 1038 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 39 हजार 859 झाली आहे. आज 508 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 26 हजार 220 झाली आहे. सध्या 11 हजार 888 रुग्ण सक्रिय आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आज मयत झालेल्या व्यक्ती भोसरी (पुरूष वय 51, 46, 47), चिखली (पुरूष वय 70, स्त्री 47), पिंपळे गुरव (पुरूष वय 45), पिंपरी (स्त्री वय 36), मासुळकर कॉलनी (पुरूष वय 78), मोशी (पुरूष वय 75), रुपीनगर (पुरूष वय 41), निगडी (पुरूष वय 60), तळवडे (स्त्री वय 34), चऱ्होली (पुरूष वय 62, 70), सांगवी (पुरूष वय 65), विश्रांतवाडी (पुरूष वय 64, 80), पाषाण (पुरूष वय 75, स्त्री 62), राजगुरूनगर (पुरुष वय 65) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 1038 coroa patients were found in pimpri chinchwad on friday 21 august 2020