मावळ तालुक्यात आजही कोरोनाबाधितांचा आकडा मोठाच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

मावळ तालुक्‍यात कोरोना रुग्ण वाढीचा सिलसिला सुरूच आहे.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्‍यात कोरोना रुग्ण वाढीचा सिलसिला सुरूच आहे. शुक्रवारी (ता. 11) दिवसभरात नव्याने 138 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्‍यातील एकूण रुग्ण संख्या दोन हजार 848 झाली असून, आतापर्यंत 103 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, एक हजार 913 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 138 जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक 54, लोणावळा येथील 23, वडगाव येथील 15, सोमाटणे येथील 13, कामशेत येथील सहा, कान्हे येथील चार, कुसगाव बुद्रूक येथील तीन, इंदोरी, नवलाख उंब्रे, कार्ला व गोवित्री येथील प्रत्येकी दोन; तर वराळे, कुरवंडे, डोंगरगाव, धामणे, सुदवडी, दहिवली, जांभूळ, नायगाव, चिखलसे, जोवण, बेबडओहोळ व कुसगाव खुर्द येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार 848 झाली असून, त्यात शहरी भागातील एक हजार 618, तर ग्रामीण भागातील एक हजार 230 जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक 939, लोणावळा येथे 500 व वडगाव येथे रुग्णसंख्या 179 एवढी झाली आहे. आतापर्यंत 103 जणांचा मृत्यू झाला आहे. एक हजार 913 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी 80 जणांना घरी सोडण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या तालुक्‍यात 832 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 373 जण लक्षणे असलेले व 459 जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या 373 जणांपैकी 271 जणांमध्ये सौम्य, तर 90 जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. 12 जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या 832 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 138 people's found corona positive in maval taluka on friday 11 august 2020