esakal | Corona Updates : आज चिंचवडमधील चौघांचा, तर भोसरीतील तिघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates : आज चिंचवडमधील चौघांचा, तर भोसरीतील तिघांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात आज 159 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 85 हजार 677 झाली आहे.

Corona Updates : आज चिंचवडमधील चौघांचा, तर भोसरीतील तिघांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 159 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 85 हजार 677 झाली आहे. आज 414 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 81 हजार 784 झाली आहे. सध्या दोन हजार 408 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील आठ आणि शहराबाहेरील चार, अशा 12 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 485 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 610 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष भोसरी (वय 60, 64 व 52), रहाटणी (वय 54), चिंचवड (वय 72, 74 व 65). महिला चिंचवड (वय 55) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष येरवडा (वय 69), वेल्हे (वय 75). महिला आंबेगा (वय 76) व खेड (वय 71) येथील रहिवासी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत शहरात एक हजार 314 पथकांद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या चार दिवसांत 10 लाख 55 हजार 120 जणांचे सर्वेक्षण केले. दोन हजार 193 जणांना कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांच्या घशातील द्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 91 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.