esakal | पिंपरी-चिंचवड शहरात आज 173 नवीन रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड शहरात आज 173 नवीन रुग्ण 
  • पिंपरी-चिंचवड शहरात आज 173 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 87 हजार 433 झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज 173 नवीन रुग्ण 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 173 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 87 हजार 433 झाली आहे. आज 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 84 हजार 125 झाली आहे. सध्या एक हजार 782 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 526 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 627 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष काळेवाडी (वय 60), दिघी (वय 83), पिंपरी (वय 69) येथील रहिवासी आहेत. आज शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही. ही दिलासादायक बाब आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेचा आज समारोप झाला. या अंतर्गत शहरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली आहे. त्यासाठी एक हजार 314 पथके नियुक्त केले होते. या मोहिमेत 21 लाख 50 हजार 750 नागरिकांची तपासणी केली. त्यात चार हजार 968 व्यक्तींच्या घशातील द्रावांचे नमुने तपासण्यात आले. त्यात 171 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.