मावळात आज ३४ पॉझिटिव्ह; सक्रिय रुग्णांची संख्या होतेय कमी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

मावळ तालुक्यात रविवारी दिवसभरात ३४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात रविवारी दिवसभरात ३४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ५ हजार २७३ झाली आहे. आतापर्यंत १७८ जणांचा मृत्यू झाला असून, ४ हजार ६६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ३४ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १६, वडगाव व भाजे येथील प्रत्येकी तीन, लोणावळा, माळवाडी व सोमाटणे येथील प्रत्येकी दोन, इंदोरी, सुदुंबरे, शिरगाव, ब्राम्हणवाडी, बेलज व तळेगाव दाभाडे ग्रामीण येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण सुमारे ८८ टक्क्यांवर पोचले आहे. मृत्यूचे प्रमाण मात्र, स्थिर म्हणजे शेकडा ३.४ एवढे आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार २७३ झाली असून, त्यात शहरी भागातील ३ हजार ५८ व ग्रामीण भागातील २ हजार २१५ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक १ हजार ५३५, लोणावळा येथे १ हजार २०४ व वडगाव येथील रुग्णसंख्या ३१९ एवढी आहे. आतापर्यंत १७८ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ हजार ६६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी ३५ जणांना घरी सोडण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या तालुक्यात ४३१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २४८ लक्षणे असलेले व १८३ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २४८ जणांपैकी २०१ जणांमध्ये सौम्य व ४७ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ४३१ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 34 corona positive in maval on sunday 11 october 2020