Corona Updates : मावळ तालुक्यात आज ३९ नवे कोरोनाबाधित

ज्ञानेश्वर वाघमारे
Thursday, 8 October 2020

मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात नव्याने ३९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात नव्याने ३९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू झाला. लोणावळा येथील ४३ वर्षीय व कल्हाट येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या पाच हजार १५६ व मृतांची संख्या १७७  झाली आहे. चार हजार ४५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी ५९ जणांना घरी सोडण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ३९ जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक २१, तळेगाव दाभाडे येथील सहा, वडगाव, सोमाटणे व देवले येथील प्रत्येकी दोन, वराळे, ऊर्से, इंदोरी, शिरगाव, नाणे व कल्हाट येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजार १५६  झाली असून, त्यात शहरी भागातील तीन हजार ३७ व ग्रामीण भागातील दोन हजार ११९ जणांचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तळेगावात सर्वाधिक एक हजार ५४३ लोणावळा येथे एक हजार १८३ व वडगाव येथील रुग्णसंख्या ३११ एवढी आहे. आतापर्यंत १७७ जणांचा मृत्यू झाला आहे. चार हजार ४५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी ५९ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ५२१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३०४ लक्षणे असलेले व २१७ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ३०४ जणांपैकी २६२ जणांमध्ये सौम्य व ४१ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. एक जण गंभीर आहे. सध्या सक्रिय असलेल्या ५२१ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 39 corona positive in maval taluka on thursday 8 october 2020