esakal | मावळात दिवसभरात ४४ पॉझिटिव्ह; सहा जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

मावळात दिवसभरात ४४ पॉझिटिव्ह; सहा जणांचा मृत्यू

मावळ तालुक्यात मंगळवारी दिवसभरात ४४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

मावळात दिवसभरात ४४ पॉझिटिव्ह; सहा जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात मंगळवारी दिवसभरात ४४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधित सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तळेगाव दाभाडे येथील चार व शिरगाव येथील दोघांचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या पाच हजार ३९९ झाली आहे. आतापर्यंत १८५ जणांचा मृत्यू झाला असून, चार हजार ९२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ४४ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक नऊ, वडगाव व तळेगाव दाभाडे ग्रामीण येथील प्रत्येकी पाच, टाकवे बुद्रुक येथील चार, लोणावळा व शिरगाव येथील प्रत्येकी तीन, वराळे, माळवाडी व गोडुंब्रे येथील प्रत्येकी दोन, कुसगाव बुद्रुक, कान्हे, गहुंजे, काले, सोमाटणे, डोंगरगाव, वडेश्वर, इंदोरी व ब्राम्हणवाडी येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण सुमारे ९० टक्क्यांवर पोचले आहे. मृत्यूचे प्रमाण मात्र स्थिर म्हणजे शेकडा ३.४ एवढे आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार ३९९ झाली असून त्यात ४६६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २५१ लक्षणे असलेले तर २१५ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २५१ जणांपैकी २०६ जणांमध्ये सौम्य व ४५ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ४६६ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.