मावळात आज ४७ पॉझिटिव्ह अन् ४७ जणांना डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ५ हजार ५४९ झाली आहे.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात ४७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ५ हजार ५४९ झाली आहे. आतापर्यंत १८५ जणांचा मृत्यू झाला असून, ५ हजार ४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ४७ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक २०, धामणे येथील सात, लोणावळा येथील पाच, वडगाव येथील चार, टाकवे बुद्रुक येथील तीन, तळेगाव दाभाडे ग्रामीण, सोमाटणे व चांदखेड येथील प्रत्येकी दोन, आढले बुद्रुक व नाणोली तर्फे चाकण येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार ५४९ झाली असून, त्यात ४४७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २१९ लक्षणे असलेले व २२८ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २१९ जणांपैकी १९० जणांमध्ये सौम्य व २८ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. एक जण गंभीर आहे. सध्या सक्रिय असलेल्या ४४७ रुग्णांवर  विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 47 corona positive found and 47 discharged in maval