मावळात दिवसभरात ४९ नवे पॉझिटिव्ह, तर...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

मावळ तालुक्यात मंगळवारी (ता. 15) दिवसभरात नव्याने ४९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात मंगळवारी (ता. 15) दिवसभरात नव्याने ४९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार १६८ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हजार १९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ४९ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १३, लोणावळा येथील १२, कामशेत येथील आठ, गहुंजे व कान्हे येथील प्रत्येकी तीन, तळेगाव दाभाडे ग्रामीण व वारू येथील प्रत्येकी दोन; तर वडगाव, ब्राम्हणवाडी, नायगाव, सुदवडी, कुणे नामा, साळूंब्रे व करंजगाव येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार १६८ झाली असून, त्यात शहरी भागातील एक हजार ८२४ तर ग्रामीण भागातील एक हजार ३४४ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक ९९२, लोणावळा येथे ६१८, तर वडगाव येथे रुग्णसंख्या २१४ एवढी झाली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आतापर्यंत १०७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन हजार १९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी ८२ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ८६२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ४४४ जण लक्षणे असलेले तर ४१८ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ४४४ जणांपैकी ३०५ जणांमध्ये सौम्य तर १३२  जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. सात जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ८६२ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 49 corona positives in maval