esakal | Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 490 नवे पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 490 नवे पॉझिटिव्ह 
  • पिंपरी-चिंचवड शहरात आज 490 रुग्ण आढळले.

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 490 नवे पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 490 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 82 हजार 993 झाली आहे. आज 474 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 77 हजार 237 झाली आहे. सध्या चार हजार 344 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील महापालिकेच्या रुग्णालयांत दोन हजार 835 रुग्ण उपचार घेत आहेत. आज शहरातील सात आणि बाहेरील पाच अशा 12 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 412 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 545 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष निगडी (वय 73), मोशी (वय 70), कासारवाडी (वय 65), पुनावळे (वय 69), चिंचवड (वय 48), पिंपळे निलख (वय 70) आणि महिला चिखली (वय 68) येथील रहिवासी आहेत. 

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष आंबेगाव (वय 57), देहूगाव (वय 55), सातारा (वय 75), सोलापूर (वय 70) आणि महिला धायरी (वय 69) येथील रहिवासी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत शहरात 1314 पथकांद्वारे घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. आजपर्यंत 23 लाख 12 हजार 989 जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातय 2715 जण संशयित आढळले. त्यांची तपासणी केल्यानंतर 579 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. शनिवारी (ता. 10) सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा 12 ते 24 ऑक्‍टोबर या कालावधीत केला जाणार आहे.