मावळात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय; आज आढळले 'एवढे' पॉझिटिव्ह

मावळात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय; आज आढळले 'एवढे' पॉझिटिव्ह

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या व मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मंगळवारी दिवसभरात ५१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर  कोरोनाबाधित तीन जणांचा मृत्यू झाला. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या १ हजार २०५ व मृतांची संख्या ४४ झाली आहे. ७१७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ५१ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १७, कामशेत येथील नऊ, लोणावळा येथील आठ, वडगाव येथील सहा, वराळे येथील तीन, कान्हे व सुदुंबरे येथील प्रत्येकी दोन; तर चांदखेड, टाकवे बुद्रुक, कुसगाव पमा व नाणे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. कोरोनाबाधित कामशेत येथील ५३ वर्षीय पुरुष, तळेगाव येथील ७१ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ हजार २०५ झाली असून, त्यात शहरी भागातील ६०८ व ग्रामीण भागातील प्रत्येकी ५९७ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ३९३, लोणावळा येथे १३०, तर वडगाव येथील रुग्ण संख्या ८५ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ७१७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

मंगळवारी २७ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात सध्या ४४४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २८९ जण लक्षणे असलेले, तर १५५ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २८९ जणांपैकी २१२ जणांमध्ये सौम्य व ६२ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १४ जण गंभीर, तर एक जण अत्यवस्थ आहे. सध्या ४२१ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून, २३ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com