कोरोना रुग्ण संख्येबाबत पिंपरी-चिंचवडकरांना आज दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (ता. 28) 554 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 76 हजार 633 झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (ता. 28) 554 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 76 हजार 633 झाली आहे. आज 959 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 68 हजार 255 झाली आहे. सध्या सात हजार 88 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील 10 आणि शहराबाहेरील पाच, अशा 15 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 290 आणि शहराबोहरील मृतांची
संख्या 479 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक काळभोरनगर (पुरुष वय 65), निगडी (पुरुष वय 56 व 72), चिखली (पुरुष वय 53 व 57), सांगवी (पुरुष वय 65), चिंचवड (स्त्री वय 67), वाकड (स्त्री वय 29), पुनावळे (पुरुष वय 85), वाल्हेकरवाडी (पुरुष वय 70) येथील रहिवासी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक देहूगाव (स्त्री वय 65), मुळशी (स्त्री वय 55), आंबेगाव (स्त्री वय 65), लोणावळा (पुरुष वय 67) आनि चाकण
(पुरुष वय 61) येथील रहिवासी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 554 corona positive found in pimpri chinchwad monday on 28 september 2020

Tags
टॉपिकस