esakal | रुग्णवाढीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात ५९४ कंटेन्मेंट झोन!

बोलून बातमी शोधा

रुग्णवाढीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात ५९४ कंटेन्मेंट झोन!
  • कोरोना साखळी खंडित करण्यासाठी उपाययोजना
रुग्णवाढीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात ५९४ कंटेन्मेंट झोन!
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. तो खंडित करण्यासाठी शाळा बंद, रात्री संचार बंदी, सोशल डिस्टंन्सिंग, कार्यक्रमांवर मर्यादा, अशा विविध उपाययोजना महापालिका करीत आहे. रुग्णाच्या संपर्कातील किमान वीस व्यक्तींची तपासणी केली जात आहे. संपर्कातील व्यक्तींना क्वॉरंटाइन करून कंटेन्मेंट झोन जाहीर केले जात आहेत. रविवारपर्यंत ५४० कंटेन्मेंट झोन केले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना संसर्ग आढळल्यानंतर शहरातील पहिले कंटेन्मेंट झोन पुनावळे व ताथवडेत करण्यात आले. रुग्ण आढळल्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटरचा परिसर सरकारच्या सूचनांनुसार सील केला जात होता. म्हणजेच सुरुवातीला एक किलोमीटर कंटेन्मेंट झोन असायचा. त्यानंतरच्या सूचनांनुसार कंटेन्मेंट झोनच्या रचनेत बदल करण्यात आला. एक किलोमीटर ऐवजी ‘तो’ भाग, वस्ती, गल्ली कंटेन्मेंट म्हणून जाहीर केली जायची. त्यानंतर या क्षेत्रात वेळोवेळी बदल करण्यात आले. कंटेन्मेंटचे क्षेत्र एखाद्या सोसायटी पुरते. नंतर एखाद्या बिल्डिंग पुरते मर्यादित केले. दिवाळीच्या काळात तर केवळ रुग्ण राहात असलेले घर, सोसायटीतील त्याची सदनिका असलेला मजलाच केवळ सील केला जायचा. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिवाळीनंतर मात्र सर्व नियम शिथिल केले. शाळा सुरू झाल्या. सभागृह खुले झाले. कार्यक्रम होऊ लागले; पण फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्ण वाढू लागले आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू झाल्या. पुन्हा कंटेन्मेंट झोन वाढू लागले. त्यांची रचना मात्र अगोदरपेक्षा उलट्या क्रमाने केली जात आहे. सध्या रुग्णाच्या घराचा परिसर किंवा रुग्ण आढळलेल्या इमारतीतील तो राहात असलेला मजलाच केवळ कंटेन्मेंट केला जात आहे, तरीही कोरोना साखळी खंडित न झाल्यास व रुग्ण आणखी वाढू लागल्यास कंटेन्मेंट झोनचे क्षेत्रात वाढ केली जाईल, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दृष्टिक्षेपात कंटेन्मेंट झोन 

  • मेजर : १०६ 
  • मायक्रो : ४३४ 

रविवारची कंटेन्मेंट तपासणी 

  • स्वयंसेवकांनी भेट दिलेली घरे : १०२१ 
  • तपासणी केलेले नागरिक : ३३७७