मावळात आज ७६ नवे पॉझिटिव्ह, तर दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

मावळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात नव्याने ७६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू झाला.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात नव्याने ७६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू झाला. कार्ला येथील ६३ वर्षीय पुरुष व साळूंब्रे येथील ७८ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार ४९३ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत १११ जणांचा मृत्यू  झाला असून, दोन हजार ५२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ७६ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक ३१, लोणावळा येथील नऊ, तळेगाव दाभाडे ग्रामीणमधील सात, कामशेत येथील सहा, इंदोरी येथील पाच, शिरगाव येथील तीन, वडगाव, कुसगाव बुद्रुक, जांभूळ, वाकसई व नवलाख उंब्रे येथील प्रत्येकी दोन; तर टाकवे बुद्रुक, सोमाटणे, सुदुंबरे, काले व शिवली येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार ४९३ झाली असून, त्यात शहरी भागातील दोन हजार १३ व ग्रामीण भागातील एक हजार ४८० जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक एक हजार ८७,  लोणावळा येथे ७०० आणि वडगाव येथे रुग्णसंख्या २२६ एवढी झाली आहे. आतापर्यंत १११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन हजार ५२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी ७९ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ८५८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ५१६ जण लक्षणे असलेले व ३४२ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ५१६ जणांपैकी ३६४ जणांमध्ये सौम्य, तर १४५ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. सात जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ८५८ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुक्तीचे वाढते प्रमाण 

मावळ तालुक्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी सुमारे ७२ टक्के जणांनी कोरोनावर मात केली आहे. मृत्यूचे प्रमाणही शेकडा चारवरून तीनपर्यंत खाली आहे. ही दिलासादायक बाब म्हणता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 76 corona positive in maval