

New Post Offices Approved in Pimpri Chinchwad Areas
चिंचवड : थेरगाव, वाकड, ताथवडे, पिंपळे सौदागर व पुनावळे येथे नवीन टपाल कार्यालये सुरू करण्यास पुणे शहर पूर्व टपाल विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची जुळवणी करण्याचे कामदेखील पूर्ण झाले असून, कार्यालयांसाठी स्वतंत्र पिनकोडदेखील आरक्षित करण्यात आले आहेत. मात्र, थेरगाव वगळता जागा अद्याप निश्चित न झाल्याने टपाल कार्यालयाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.