
नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नवीन नियमावली लागू करण्याचा आदेश आयुक्त हर्डीकर यांनी गुरुवारी (ता. 24) सायंकाळी काढला.
पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करावा. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी 50 पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती नसावी. 31 डिसेंबर रोजी आयोजित प्रार्थना मध्यरात्रीऐवजी सायंकाळी सात किंवा त्यापूर्वी घेण्याचे नियोजन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नवीन नियमावली लागू करण्याचा आदेश आयुक्त हर्डीकर यांनी गुरुवारी (ता. 24) सायंकाळी काढला. त्यात म्हटले आहे, की साथरोग प्रतिबंधक अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायदा शहरात लागू आहे. नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी नागरिकांनी टाळावी. सामाजिक अंतर राखावे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. चर्चच्या परिसरांत दुकाने किंवा स्टॉल लावू नयेत. 60 वर्षांवरील नागरिक व दहा वर्षांखालील बालकांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. त्यांच्यासाठी प्रार्थनेची ऑनलाइन व्यवस्था करावी. सांस्कृतिक कार्यक्रम व मिरवणूक टाळावी. आतषबाजी करू नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे पालन करावे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by Shivnandan Baviskar)