Nigdi Akurdi Road: निगडी पासून आकुर्डी मार्गे पुण्याकडे जाणारा रस्ता झाला अत्यंत धोकादायक, स्थानिक नागरिकांची तक्रार
Metro Work: निगडीपासून आकुर्डीमार्गे पुण्याकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब स्थितीत आहे, ज्यामुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांना धोका निर्माण होतो. मेट्रोच्या कामामुळे खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडी वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
पिंपरी : निगडीपासून बजाज गेट समोरील आकुर्डीमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याची दैन्यावस्था झाली आहे. हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. सततची खोदकामे आणि मेट्रोच्या कामामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे.