- राहुल हातोले
पिंपरी - पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार होत असताना आता भक्ती-शक्ती ते थेट चाकणपर्यंत मेट्रो मार्ग नेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा अर्थात ‘डीपीआर’ महामेट्रो प्रशासनाने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे सुपूर्त केला आहे. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरातील सुमारे ७५ टक्के भाग मेट्रो मार्गांशी जोडला जाणार आहे.