esakal | पिंपरी : पुरातन नाणे विकणाऱ्या नऊ जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : पुरातन नाणे विकणाऱ्या नऊ जणांना अटक

- निगडी पोलिसांकडून नऊ जणांना अटक

पिंपरी : पुरातन नाणे विकणाऱ्या नऊ जणांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पुरातन काळातील धातूचे नाणे एका होमगार्डला विकून त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नऊ जणांना निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई आकुर्डीतील खंडोबामाळ येथे केली. (nine arrested for selling antique coins in akurdi)

हरीश परशुराम पाटील (वय ६८, रा. औरंगाबाद), संजय अर्जुन कुचेकर (वय ४२, रा. खराडी, पुणे), सुजित राजेंद्र सारफळे (वय २१, रा. उस्मानाबाद), प्रमोद रामचंद्र बचाटे (वय ४०, रा. उस्मानाबाद), राजेश विजयकुमार गोवर्धन (वय ४१, रा. उस्मानाबाद), ज्योतीराम भीमराव पवार (वय ४४, रा. संमतानगर, उस्मानाबाद), रत्नाकर विजय सावंत, किशोर ज्ञानेश्वर भगत (वय ३६, दोघे रा. गोपाळनगर, डोंबिवली पूर्व) व इमरान हसन खान (वय ४३, रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा: आता फेसबुक अकाउंट हॅकचा फंडा; अधिकारी, पदाधिकारी टार्गेट

आरोपींनी संगनमत करून पुरातन काळातील धातूचे नाणे (लिबो कॉईन) ज्यामध्ये हाय इरिडिअम नावाचे केमिकल आहे. त्यामुळे त्याला मार्केटमध्ये दहा कोटी रुपयांची किंमत असल्याचे भासवून फसवणुकीच्या हेतूने होमगार्ड वैभव तावरे यांना विकण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी (ता. १०) दुपारी सव्वा एकच्या सुमारास आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात लाखांची रोकड, पुरातन काळातील एक नाणे, एक लाख १९ हजार ५०० रुपये किंमतीचे नऊ मोबाईल, आठ लाख ५० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारी असा मुद्देमाल जप्त केला.