देहू संस्थानच्या अध्यक्षपदी नितीन महाराज मोरेंची निवड

Nitin_More_Dehu
Nitin_More_Dehu

देहू (पुणे) : देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदाच्या रविवारी (ता. 21) झालेल्या निवडणुकीत आबाजीबुवा शाखेचे नितीन गोपाळ मोरे महाराज 34 मतांनी विजयी झाले. नितीन महाराज मोरे यांना 164 मते मिळाली. तर रामभाऊ मोरे यांना 130 मते मिळाली. संस्थानच्या अध्यक्ष पदाची निवडणूक दोन वर्षासाठी आहे. संस्थानचे विद्यमान अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांची अध्यक्षपदाची मुदत येत्या 31 मार्च रोजी संपत आहे. त्यातच यंदा संत तुकाराम महाराज बीज सोहळा येत्या 30 मार्च रोजी आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी संस्थानमध्ये निवडणूक घेण्यात आली.

याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश महाराज मोरे म्हणाले की, ''संस्थानच्या आबाजीबुवा, गणेशबुवा आणि गोविंदबुवा अशा तीन शाखा आहेत. यंदा आबाजीबुवा शाखेला अध्यक्षपदाची संधी होती. त्यानुसार या शाखेतून नितीन महाराज मोरे, रामभाऊ मोरे हे दोन निवडणूक रिंगणात होते. संस्थानचे तीन शाखांचे मिळून 372 मतदार आहेत. त्यापैकी 297 जणांनी मतदान केले. यात नितीन महाराज मोरे यांना 164 मते पडली. तर रामभाऊ मोरे यांना 130 मते पडली. तीन मते बाद झाली. त्यामुळे नितीन महाराज मोरे 34 मतांनी विजयी झाले. सुजित महाराज मोरे यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.''

निवडीनंतर नितीन महाराज मोरे म्हणाले, ''जगातील कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, ही संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करत आहे. संत तुकाराम महाराजांची शिकवण घरोघरी पोचावी म्हणून कार्य करणार आहे. देहूत अनेक सुविधा शासनाने पुरविलेल्या आहेत. काही सुविधांची कामे कोरोनामुळे शिल्लक आहेत. भविष्यात वारकरी आणि भाविकांच्या सुविधांना प्राधान्य देणार आहे. देऊळवाड्यात विकास कामे सुरू आहेत. येत्या दोन वर्षात ही कामे पूर्ण करणार आहे. त्यासाठी संस्थानच्या विश्वस्त आणि सर्वांचे मार्गदर्शन घेणार आहे.''

- पिंपरी-चिंचवडमधील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com