मास्क नाही मग वस्तूही नाही; 'या' बाजारपेठेचा निर्णय

मास्क नाही मग वस्तूही नाही; 'या' बाजारपेठेचा निर्णय

पवनानगर : मास्क नसल्यास वस्तू मिळणार नाही. पवनानगर बाजापेठेच्या सुरक्षेसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने काले पवनानगर ग्रामपंचायत, लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन व  व्यापारी यांनी लाेणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निरंजन रणवरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला.

पवनानगर ही परिसरातील गावांसाठी मुख्य बाजारपेठ असल्याने कोरोना संकट टाळण्यासाठी प्रत्येक दुकानदाराने मास्क लावूनच मालाची विक्री करायची तर ज्या ग्राहकाच्या तोंडाला मास्क नाही त्यांच्याशी व्यापार न करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पवनानगर बाजारपेठत सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, ग्रामपंचायतीमार्फत पार्किंगसाठी सम-विषम तारखेचे फलक लावणे, रस्त्यावर दुभाजक लावण्याचे निर्णय झाले तर शनिवार, रविवारी येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्यासाठी ग्रामपंचायत व लोणावळा ग्रामीण खबरदारी घेणार असल्याचे सरपंच खंडू कालेकर यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेस व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विलास छाजेड पवनानगरचे माजी उपसरपंच संदिप भुतडा आरपीआयचे तालुका अध्यक्ष  लक्ष्मण भालेराव  मंगेश कालेकर, ग्रामपंचायत सदस्य रमेश कालेकर, ज्ञानेश्वर ठाकर, सुरेश गुप्ता, संतोष गांधी शक्ति जव्हेरी, सतिष राठी, विलास वरघडे, सुरेश पोटे अशुतोष गांधी,  पोलिस हवालदार संतोष शेळके, सुनिल गवारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com