पिंपरी-चिंचवडकरांसाठी आजचा दिवस दिलासादायक; तर पुण्यातील एकाचा मृत्यू 

पिंपरी-चिंचवडकरांसाठी आजचा दिवस दिलासादायक; तर पुण्यातील एकाचा मृत्यू 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासाठी आजचा सोमवार (ता. 11) दिलासादायक ठरला. कारण शहरातील कोणालाही संसर्ग झाला नसल्याचे तपासणीत आढळून आले. उलट मोशी व इंदिरानगर-चिंचवड स्टेशन येथील दोन जण बरे होऊन घरी गेले. तसेच, 44 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र, पुण्यातील नाना पेठ व कसबा पेठेतील एक महिला व एक पुरुष पॉझिटिव्ह आढळले. या शिवाय भवानी पेठेतील रहिवासी व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयांत दाखल व्यक्तीचा मृत्यू झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापालिकेने रविवारी (ता. 10) तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविलेल्या काही नमुन्यांचे अहवाल आज सायंकाळी आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. मात्र, शहरात दाखल पुण्यातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात 35 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सध्या महापालिका रुग्णालयात 46 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 109 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील चार आणि पुण्यातील रहिवासी व पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात उपचार घेत असलेले पाच, अशा नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रधान सचिवांनी घेतला आढावा
राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सोमवारी पिंपरी-चिंचवड महापालिका वॉर रूमची पाहणी करून महापालिका करीत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपाय योजनांबाबत माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com