esakal | आता पोस्टातून मिळणार शिष्यवृत्तीची रक्कम 
sakal

बोलून बातमी शोधा

आता पोस्टातून मिळणार शिष्यवृत्तीची रक्कम 

इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचा पर्याय; टपाल खात्याच्या योजनेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद 

आता पोस्टातून मिळणार शिष्यवृत्तीची रक्कम 

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी : भारतीय डाक विभाग केवळ पत्र पाठविण्यापुरता मर्यादित राहिला नसून, इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकप्रणालीमार्फत विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आता विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे. टपाल खात्याच्या या योजनेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टपाल खात्यात इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक सुरू केल्यामुळे अनेक योजनांचा लाभ खातेदारांनी घेतला आहे. शहरातील शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी ज्यांचे बॅंक खाते नाही किंवा बॅंक खाते हे आधार क्रमांकाशी संलग्न नाही, या विद्यार्थांची शिष्यवृत्ती अद्याप बॅंक खात्यामध्ये जमा झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकद्वारे खाते उघडण्याची खास मोहीम सुरू केली आहे. तसेच, शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी या बॅंकेमध्ये खाते उघडून आधारशी संलग्नित करून दिले जाणार आहेत. खाते सुरू करण्यासाठी केवळ आधार कार्ड व पॅन कार्ड क्रमांकाची आवश्‍यकता आहे. हे खाते पेपरलेस असून, ऑनलाइन त्याचा वापर करता येतो. 

या आहेत शिष्यवृत्ती 
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य सरकारची मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, निर्वाह भत्ता, विद्यावेतन विषयक, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (अकरावी व बारावी), सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, नववी व दहावीच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी), माध्यमिक शाळेतील पाचवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या योजना आता ऑनलाइन केल्या आहेत. या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. बॅंकेऐवजी आता टपाल खात्यावर महाडीबीटी पोर्टलमार्फत ही रक्कम जमा करण्यात येईल. 

बॅंकेपेक्षा टपाल कार्यालयात गर्दी कमी असते. वेळेत आणि लवकर खाते उघडण्यास मदत झाली. 
- रेवती साने, विद्यार्थिनी 

पोस्ट कार्यालय घराजवळ असल्याने सोयीचे झाले आहे. कुठल्याच प्रकारे पैसे लागत नाहीत. तसेच, गर्दी कमी असल्यामुळे वेळेची बचत झाली. 
- विशाल शेळके, विद्यार्थी 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेमुळे थेट त्यांच्या खात्यात जमा होतील. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेमध्ये खाते उघडावे. 
- के. एस. पारखी, जनसंपर्क निरीक्षक, भारतीय डाक विभाग, पिंपरी 
 

loading image