- बेलाजी पात्रे
हिंजवडी - आयटी पार्क टप्पा क्रमांक दोन येथील इन्फोसिस कंपनी परिसरात राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) कमांडोनी बुधवारी (ता. ६) एक व्यापक मॉक ड्रिल सत्राचे आयोजन केले होते. त्यासाठी तब्बल शंभरहुन अधिक जवान व अधिकारी हेलिकॉप्टरद्वारे दुपारी हिंजवडीत दाखल झाले होते. या मॉक ड्रिलचा उद्देश दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जाण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचे समन्वय, तत्परता आणि प्रतिसाद क्षमता तपासणे हा होता.