मावळात आज कोरोनाबाधितांचा आकडा शंभरवर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

गेल्या काही दिवसात तालुक्या बाहेरील रुग्णालयात झालेल्या १८ जणांच्या मृत्यूंची नोंदही आज करण्यात आली त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ४ हजार ४९५ तर मृतांची संख्या १५८ झाली आहे.

वडगाव मावळ - मावळ तालुक्यात  रविवारी दिवसभरात १०० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोनामुक्त झालेल्या १६२ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( ८० टक्के ) वाढत आहे मात्र मृत्यूंचे प्रमाण मात्र स्थिर ( शेकडा तीन ) आहे. गेल्या काही दिवसात तालुक्या बाहेरील रुग्णालयात झालेल्या १८ जणांच्या मृत्यूंची नोंदही आज करण्यात आली त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ४ हजार ४९५ तर मृतांची संख्या १५८ झाली आहे. ३ हजार ६१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी १६२ जणांना घरी सोडण्यात आले. 

रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या १०० जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक २७, लोणावळा येथील १८, वडगाव येथील १०, तळेगाव दाभाडे ग्रामीण मधील आठ, इंदोरी येथील पाच,  कामशेत येथील चार, वराळे व दारूंब्रे येथील प्रत्येकी तीन, सोमाटणे, टाकवे बुद्रुक, डोंगरगाव, नाणे, औंढे खुर्द व दहीवली येथील प्रत्येकी दोन तर परंदवडी, गहुंजे, सुदुंबरे, जांभूळ, नायगाव, कांब्रे नामा, मोहितेवाडी, येळसे, कार्ला व भोयरे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ४९५ झाली असून त्यात शहरी भागातील २ हजार ६१४ तर ग्रामीण भागातील १ हजार ८८१ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक १ हजार ३६२,     लोणावळा येथे ९७६ तर वडगाव येथे रुग्णसंख्या २७६ एवढी झाली आहे. आत्तापपर्यंत १५८ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ हजार ६१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी १६२ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ७२७ सक्रिय रुग्ण असून त्यातील ४८६ लक्षणे असलेले तर २४१ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ४८६ जणांमध्ये ३८९ जणांमध्ये सौम्य तर ९४ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. तीन जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ७२७  जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अठरा मृत्यूंची नोंद
गेल्या काही दिवसांमध्ये मावळ तालुक्याच्या बाहेरील रुग्णालयात झालेल्या १८ जणांच्या मृत्यूंची नोंद तालुक्यात करण्यात आली. त्यात सुदुंबरे येथील ६१ वर्षीय पुरुष, कार्ला येथील ६४ वर्षीय महिला, कामशेत येथील ६४ वर्षीय पुरुष, दारूंब्रे येथील ७४ वर्षीय पुरुष, सुदुंबरे येथील ४३ वर्षीय पुरुष, मळवली येथील ७९ वर्षीय पुरुष, लोणावळा येथील ८०, ६९ व ६० वर्षीय पुरुष, डोंगरगाव वाडी येथील ६९ वर्षीय महिला, कुसगाव येथील ५९ वर्षीय पुरुष, तळेगाव दाभाडे येथील ४७, ६२, ४९ व ७४ वर्षीय महिला तर ६१ व २५ वर्षीय पुरुष, गहुंजे येथील ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of corona victims in Maval cross one hundred