पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा पोहोचला 300 वर...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

- वायसीएम व भोसरी रुग्णालयांत 280; शहरातील 20 रुग्ण पुण्यात.

- आज सकाळी नऊपर्यंतची आकडेवारी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या शनिवारी सकाळी नऊपर्यंत 300 झाली. यात शुक्रवारी रात्री सातपासून शनिवारी सकाळी नऊपर्यंत 15 रुग्णांची भर पडली. या 300 जणांमध्ये महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत दाखल 280, पुण्यातील रुग्णालयांत दाखल 20 रुग्णांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णसंख्येने 300 चा आकडा गाठला असला तरी बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्याही 162 पर्यंत पोचली आहे. आज एका जणाला डिस्चार्ज मिळाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात संसर्ग सुरू होऊन 70 दिवस उलटून गेले आहेत. या दिवसांत अनेक घटना घडल्या आहेत. सुरवातीला सोसायटीत आढळलेला कोरोना आता मध्यमवर्गीय वस्तीतून झोपडपट्टीत शिरला आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेचे वायसीएम व भोसरी रुग्णालय सज्ज आहे.‌ शिवाय मोबाईल लॅबद्वारे वस्ती पातळीवर कोरोना पूर्व चाचणी मोफत केली जात आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत 111 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत बाधा झालेल्यांमध्ये सर्वाधिक तरुण आहेत. पण, ज्या प्रमाणात रुग्ण वाढताहेत, त्या प्रमाणात कमी सुद्धा होताहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी डाॅक्टर, नर्स, सेवक, पोलिस, महापालिका अधिकारी कर्मचारी लढत आहेत. त्यांच्या लढ्याला यशही येत आहे. हीच आपल्यासाठी जमेची बाजू आहे. कारण, मृत्यू प्रमाण कमी आहे.  त्यामुळे आपण कोरोनावर मात करतोय हे दिसतंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Coronavirus Patient Increasing in Pimpri Chinchwad Now 300 Patients