pune municipal corporation and pcmc
sakal
पिंपरी - पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह २६ आणि पुण्यातील २६, अशा ५२ नगरसदस्यांचा कुणबी जात प्रमाणपत्रावर पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.
त्याविषयी पुणे जिल्हा जात पडताळणी समितीकडे जानेवारीत तक्रार करण्यात आली आहे. त्याची सुनावणी शुक्रवारपासून (ता.६) समितीच्या विश्रांतवाडीतील कार्यालयात सुरू होत आहे. महापौरांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता बोलवले आहे.