esakal | पिंपरीत मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा विचारला जाब; पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण

बोलून बातमी शोधा

Woman Harrassed
पिंपरीत मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा विचारला जाब; पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण
sakal_logo
By
विनायक होगाडे

पिंपरी : अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा जाब विचारल्याने दोघांनी मिळून पीडित मुलीच्या वडिलांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना मोशीतील बोराटेवस्ती येथे घडली. आशिष रामचंद्र गालफाडे, प्रभू गालफाडे (दोघे रा. बोराटेवस्ती, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी रामचंद्र गालफाडे यांच्याकडून घर विकत घेतले आहे.

त्या कारणावरून आशिष याने रविवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी यांच्या सोळा वर्षीय मुलीसोबत अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत फिर्यादी यांनी आशिष याला जाब विचारला असता आशिष आणि प्रभू या दोघांनी मिळून फिर्यादी आणि त्यांच्या मुलींना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. आरोपींना समजावून सांगत असताना दोघांनी मिळून सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून फिर्यादी यांना जखमी केले. याप्रकरणी मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.