esakal | परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्यांना लसीकरणाच्या ‘तांत्रिक’ गोंधळाचा अडसर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्यांना लसीकरणाच्या ‘तांत्रिक’ गोंधळाचा अडसर

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पिंपरी - मला अपॉइंटमेंटच मिळत नाही. महापालिकेच्या (Muncipal) ‘मी जबाबदार’ ॲपवरून मेसेज (App Message) आलाच नाही. मेसेज आला, तर यादीत नाव नाही. ॲपमध्ये माहिती भरताना माहिती (Information) स्वीकारली जात नाही. तांत्रिक बाबींचा अडसर (Technical Problem) महापालिकेने दूर करायला हवा. आम्हाला मानसिक त्रास होतोय, अशा एक ना अनेक अडचणी परदेशी उच्च शिक्षणासाठी (Abroad High Education) जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी (Student) ‘सकाळ’कडे मांडल्या. (Obstacles to the Technical Confusion of Vaccination for Foreign Education)

परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी व कागदपत्रांची पडताळणी करून नवीन जिजामाता रुग्णालयात लस देण्यासाठी वैद्यकीय विभागाने शनिवारी (ता. १२) सकाळी १० वाजता बोलावले होते. महापालिकेने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठ प्रवेशाचे निश्चितीपत्र, परदेशी व्हिसा, व्हिसासाठी प्राप्त झालेले आय-२० किंवा डीएस-१६० फॉर्म या कागदपत्रानंतर तसेच ‘मी जबाबदार’ ॲपवर नोंदणी असल्यास लस दिली जाणार आहे. मेसेज न आलेल्यांना व ॲपवर नोंदणी न केलेल्यांना लस दिली जाणार नाही. ही नोंदणी दर गुरुवार ते बुधवारपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच, दर शनिवारी लसीकरण होणार आहे.

हेही वाचा: लोणावळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी; कोरोनाचा पडला विसर

आतापर्यंत २४४ जणांना लस

या दोन आठवड्यांत २४४ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिजामाता रुग्णालयात दर शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत विशेष लसीकरण मोहीम राबवली जात आहे. ‘मी जबाबदार’ या ॲपवर २२९ जणांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ६४ लाभार्थी उपस्थित होते. यातील २१ जण अपात्र झाले, तर शनिवारी (ता. १२) ४३ लाभार्थ्यांना लस मिळाली.

मला युएसएला जायचे आहे. यादीत नाव आहे, पण मेसेज आला नाही. सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती, तरीही गोंधळ सुरू आहे. पुन्हा व्हिसा मिळण्यासाठी उशीर होईल. त्यासाठी दोन महिने वाट पहावी लागणार. हे चुकीचे आहे. प्रक्रिया सोपी सरळ आहे. पण, तांत्रिक अडचणी येत आहेत.

- श्‍वेता वाकडे, विद्यार्थिनी, पिंपळे सौदागर

माझी लशीच्या कामासाठी नियुक्ती केली आहे. गेल्या शनिवारपासून यादीनुसारच कामकाज सुरू आहे. काही जण तांत्रिक अडचणी आल्याच्या तक्रारी करत आहेत. सात दिवसांची ही एकूण प्रक्रिया आहे. त्यांना महापालिकेशी संपर्क साधून देत आहे. परंतु, काही जण मेसेज न येता ही थेट सेंटरला येत आहेत.

- डॉ. अजिंक्य तेलंगे, वैद्यकीय अधिकारी, जिजामाता रुग्णालय

हेही वाचा: पिंपरीचा पठ्ठ्या भारतीय क्रिकेट संघात

मला युकेला जायचे आहे. मला मेसेज आलेला नाही. यादीत नाव नाही. विद्यापीठाचे पत्र, आधार, पासपोर्टसह सर्व कागदपत्रे जोडली आहेत. जाण्या-येण्याचा त्रास होतो. आता पुन्हा मला थांबण्यासाठी सांगितले आहे.

- पूर्वा मेहता, विद्यार्थिनी, चिखली

...ही आहे वस्तुस्थिती

नवीन जिजामाता रुग्णालयात सकाळी दहा ते पाच यावेळेत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीचे काम सुरू होते. त्यानंतर त्यांना लस घेण्यासाठी पाठविण्यात येत होते. यादी रुग्णालयाच्या गेटवर लावली होती. गेल्या आठवड्यात ज्यांनी नोंदणी केली. त्यांना मेसेज न जाताही काही जण लशीसाठी चौकशी करून जात होते. परंतु, यादीत नाव येऊनही काहींना मेसेज गेले नाहीत. तसेच, बऱ्याच जणांना मेसेज आले. परंतु, यादीत नाव नव्हते. काहीजण व्हिसा मिळण्याआधीच लशींचा आग्रह करत होते. बरेच जण व्हिसा प्रक्रियेमध्ये असल्याचे सांगत होते. काही जण व्हिसा आधीच लशीची प्रक्रिया करत होते. असा एकूण गोंधळ सुरू होता. काहींना दोनदा मेसेज गेले, तर काहींना एकदाही मेसेज गेला नाही. लस घेताना प्रत्येकाला टोकन देण्यात येत होते. या सर्व प्रक्रियेत मुलांबरोबर आलेले पालक वैतागले होते.

loading image