रस्त्यावर टँकरमधून ऑइल गळती; घसरुन पडल्याने अनेकजण जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 17 January 2021

चिंचवडमधील मोहननगर चौक ते भुमकर चौक या रस्त्यावर रविवारी (ता. 17) पहाटे मोठ्या प्रमाणावर ऑईल गळती झाली.

पिंपरी- चिंचवडमधील मोहननगर चौक ते भुमकर चौक या रस्त्यावर रविवारी (ता. 17) पहाटे मोठ्या प्रमाणावर ऑईल गळती झाली.  यामुळे रास्ता निसरडा झाल्याने यावरून अनेक वाहन चालक घसरून पडले.

पहाटे मोहननगर ते डांगे चौक या मार्गावरून ऑइलचा टँकर गेला. यातून गळती झालेल्या ऑइलवरून घसरून अनेक वाहनचालक पडले . ही बाब सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आली.  याबाबत अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली.  दरम्यान, नागरिकांनी दगड व झाडाच्या फांद्या फांद्या टाकून रस्ता बंद केला. तसेच रस्त्यालगतची माती ऑइल गळती झालेल्या ठिकाणी टाकली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी ऑईलवर पाण्याची फवारणी करून रस्ता साफ केला.

दरम्यान, रस्त्यावरील ऑइलचा अंदाज न आल्याने अनेकजण यावरून घसरून पडले. यामध्ये काहीजण जखमी झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oil spill from tanker on the road Many were injured in the fall

Tags
टॉपिकस
Topic Tags: