esakal | द्रुतगती मार्गावर तेलाच्या टँकरला आग, जीवितहानी नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Oil-Tanker-Fire

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात दस्तुरी वाहतूक पोलीस मदत केंद्राजवळ आज (गुरुवारी) पहाटे तेलाच्या टँकरला अचानक आग लागली, या घटनेत टँकरचे केबिन जळून खाक झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

द्रुतगती मार्गावर तेलाच्या टँकरला आग, जीवितहानी नाही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लोणावळा - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात दस्तुरी वाहतूक पोलीस मदत केंद्राजवळ आज (गुरुवारी) पहाटे तेलाच्या टँकरला अचानक आग लागली, या घटनेत टँकरचे केबिन जळून खाक झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरघाटात पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास  मुंबईहुन पुण्याच्या दिशेने खाद्य तेल घेऊन येणाऱ्या टँकरच्या (आरजे १८जीबी ५१४९)  इंजिनमध्ये अचानक धूर निघत आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवत टँकर महामार्गाच्या कडेला घेतला. मात्र तोपर्यंत केबिनने पेट घेतला होता.   

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अपघाताची माहिती कळताच आयआरबी कंपनी, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा  घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक बंबाच्या साहाय्याने लागलेली आग विझविण्यात आली. तोपर्यंत केबिन जाळून खाक झाले होते मात्र अधिक हानी झाली नाही. सुदैवाने वाहतूक विस्कळीत झाली नाही.

Edited By - Prashant Patil