तो बेकायदेशीररित्या 'ते' बाळगत होता, मग पोलिसांना समजलं...  

तो बेकायदेशीररित्या 'ते' बाळगत होता, मग पोलिसांना समजलं...  
Updated on

पिंपरी : बेकायदेशीररित्या पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडाविरोधी पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई चिखलीतील कृष्णानगर येथे करण्यात आली. 

अमोल बसवराज वाले (वय 22, रा. सेक्‍टर क्रमांक 22, इंदिरानगर, ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी (ता. 6) रात्री पावणे आठच्या सुमारास चिखलीतील कृष्णानगर येथे आरोपी पिस्तुलासह उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला. त्यांची अंगझडती घेतली असता 40 हजार 200 रूपये किंमतीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतुस सापडले. हे पिस्तूल कोठून आणले, कशासाठी आणले होते, याबाबतचा तपास सुरू आहे. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com