सोन्याच्या भिशीच्या नावाखाली फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

कारले हा तळेगाव-दाभाडे, देहूरोड परिसरात सोन्याच्या भिशीच्या नावाखाली फसवणूक करून अनेक दिवसांपासून फरारी होता. तो तळेगाव येथील घरी येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा रचला.

पिंपरी : सोन्याच्या भिशीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली. "मोक्का'सह चार फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये तो फरारी होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संजय मारुती कारले (वय 42, रा. अनिकेत अपार्टमेंट, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कारले हा तळेगाव-दाभाडे, देहूरोड परिसरात सोन्याच्या भिशीच्या नावाखाली फसवणूक करून अनेक दिवसांपासून फरारी होता. तो तळेगाव येथील घरी येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा रचला.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 

घरी चालत येत असताना पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर देहूरोड ठाण्यातील फसवणुकीचे तीन, तर तळेगाव-दाभाडे ठाण्यात मोक्कासह फसवणुकीचा एक गुन्हा दाखल आहे. 
ही कारवाई युनिट पाचचे वरिष्ठ निरिक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक निरिक्षक राम गोमारे, कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, संदीप ठाकरे, मयूर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्‍वर गाडेकर, शामसुंदर गुट्टे, धनंजय भोसले, सावन राठोड यांच्या पथकाने केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Arrested cheating of gold bhishi in pimpari