पिंपरी-चिंचवड : मनोरूग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार; एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

मोबाईलवरून फोन करून "मी तुझा पती आहे, तू दार उघड' असे खोटे सांगून घरात शिरलेल्या एकाने मनोरूग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार थेरगाव येथे घडला.

पिंपरी - मोबाईलवरून फोन करून "मी तुझा पती आहे, तू दार उघड' असे खोटे सांगून घरात शिरलेल्या एकाने मनोरूग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार थेरगाव येथे घडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

किशोर दिनकर सूर्यवंशी (वय 30, रा. थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे पती व आरोपी हे थेरगाव येथील एका जिममध्ये सुरक्षारक्षकाची नोकरी करतात. दोघेही ड्युटीवर असताना फिर्यादीचे पती झोपी गेल्यानंतर आरोपीने फिर्यादीला मोबाईलवरून फोन केला. "मी तुझा पती आहे, तू दार उघड' असे खोटे सांगून फिर्यादीच्या घरात शिरला. ओरडल्यास मारून टाकीन, अशी धमकी देत फिर्यादी महिलेवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested for sexually abusing a mentally ill women in pimpri chinchwad