पिंपरीत आणखी एका पोलिसाला कोरोना, तर पाच जण क्वारंटाइन 

पिंपरीत आणखी एका पोलिसाला कोरोना, तर पाच जण क्वारंटाइन 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आणखी एक पोलिस हवालदार कोरोनाबाधित असल्याचा अहवाल शनिवारी (ता. 23) प्राप्त झाला. त्यामुळे आयुक्तालयातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या सातवर गेली आहे. तर कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पाच पोलिसांना शनिवारी (ता. 23) क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. यापुर्वी निरिक्षक, सहायक निरिक्षक, उपनिरिक्षक व तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. अशातच शनिवारी आणखी एका हवालदाराचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आयुक्तालयातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा आता सातवर गेला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाच पोलिस क्वारंटाईन 

दोघा भावांमध्ये वाद झाल्याने दोघेही तक्रार देण्यासाठी मंगळवारी (ता. 19) पोलिस चौकीत आले. त्यातील एकाला दुसऱ्या दिवशी सर्दी व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याची औंध येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे मागील काही दिवसांत तो ज्यांच्या संपर्कात आला त्यांची माहिती घेतली असता तो पोलिस चौकीत आल्याचे समोर आले. यामुळे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत असलेल्या एका चौकीतील पाच पोलिसांना शनिवारी क्वारंटाइन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com