पिंपरी-चिंचवडकरांनो, श्रीकृष्णजन्माचे असे घेता येणार दर्शन

पिंपरी-चिंचवडकरांनो, श्रीकृष्णजन्माचे असे घेता येणार दर्शन

पिंपरी : कोरोनामुळे मंदिरामध्ये 'नो एंट्री' असल्याने यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी घरोघरी साध्या पद्धतीने साजरी झाली. रावेत येथील इस्कॉन गोविंद धाम मंदिर व निगडीतील श्री कृष्ण मंदिरात दरवर्षी भाविकांची दर्शन, विधीवत पूजा व अभिषेकासाठी गर्दी होते. यावर्षी मात्र, रात्री बारा वाजता मोजक्‍या भाविकांमध्ये मंदिरात श्रीकृष्णजन्म साजरा होणार आहे. इस्कॉन मंदिरात भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची सुविधा केली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरोघरी श्रीकृष्ण षोडशोपचार पूजा, धूप दिपांसह नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर पुरुषसूक्त, विष्णूसुक्ताचे स्तवन करण्यात आले. श्रीकृष्णाची आरती झाली. मनोभावे भाविकांनी दिवसभर श्रीकृष्ण जन्माच्या आगमनापर्यंत व्रत केले. इस्कॉन मंदिरात बुधवारी (ता. 12) व गुरुवारी (ता. 13) विविध कार्यक्रमांचे ऑनलाइन आयोजन केले आहे. मंदिरातील मोजके निवासी भक्त कार्यक्रमांची रुपरेषा पाहत आहेत. मंदिरात आकर्षक सजावट केली आहे. राधा-कृष्णाचे रुपही विलोभनीय दिसत आहे. दोन दिवस कीर्तन, महाआरती, शंख व कलश पूजनाचे आयोजन केले आहे. भाविकांना ऑडिओ व्याख्यान, दैनिक देवदर्शन, फेसबुक लाईव्ह व ट्‌विटरवरून मंदिर समितीने देवदर्शन उपलब्ध केले आहे. भाविकांसाठी iskconnigdi.com या वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध केली आहे. यावर ऑनलाइन दक्षिणेची सुविधाही उपलब्ध असल्याचे इस्कॉन मंदिर प्रबंधक समितीचे गोपती दास यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरवर्षी शहरात गोपाळकाल्याला दहीहंडीचेही जंगी आयोजन केले जाते. चौक गजबजेले असतात. सर्व गोविंदाची रेलचेल असते. कित्येक दिवसांपासून दहीहंडी फोडण्याचा सरावही सुरू असतो. पिंपळे गुरव, वाकड, थेरगाव, निगडी, भोसरी परिसर विविध वाद्यांनी दणाणून गेलेला असतो. वॉर्डमध्ये नगरसेवकांची धावपळ सुरू असते. लाखोंच्या बक्षिसांची खैरात होते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे कोणताही कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.

Edited by Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com