मावळात आज चार रुग्णांचा मृत्यू, तर कोरोनाबाधितांची संख्या आठशे पार

ज्ञानेश्वर वाघमारे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

मावळ तालुक्यात रविवारी दिवसभरात ३० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात रविवारी दिवसभरात ३० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तळेगाव येथील तीन व कुरवंडे येथील एकाचा समावेश आहे. तालुक्यातील मृतांची संख्या २५ झाली असून, रुग्ण संख्या ८०८ वर पोचली आहे. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येबरोबरच मृत्यूंची संख्याही वाढत असल्याने नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तळेगाव येथील ४८ वर्षीय, ७८ वर्षीय व ३२ वर्षीय पुरुषांचा व कुरवंडे येथील ६३ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. त्यांना इतरही काही आजार होते. रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ३० जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १९, तळेगाव दाभाडे (ग्रामीण) व कामशेत येथील प्रत्येकी दोन, तर लोणावळा, वडगाव, वराळे, सुदुंबरे, बधलवाडी व आढले बुद्रुक येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८०८ झाली असून, त्यात शहरी भागातील ३७५ तर ग्रामीण भागातील ४३३ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक २६०, लोणावळा येथे ६५ तर वडगाव येथील रुग्ण संख्या ५० झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी २२ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात सध्या ४१३ सक्रिय रुग्ण असून, त्यात २४४ लक्षणे असलेले व १६९ लक्षणे नसलेले आहेत. लक्षणे असलेल्या २४४ जणांपैकी १७७ जणांमध्ये सौम्य व ५६ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. दहा जण गंभीर तर एक जण अत्यवस्थ आहे. २५५ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असून १८८ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: over eight hundred corona positive in maval taluka