palkhi route metro work digging
sakal
पिंपरी - संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. तरीही मार्गावरील खड्डे, राडारोडा, पदपथांची अपूर्ण कामे, मेट्रोच्या कामांचे अडथळे अशा विविध कारणांनी ही वाट अडथळ्यांची झाली आहे. ही कामे आठ दिवसांत पूर्ण होणे शक्य आहे का, असा प्रश्न ‘सकाळ’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उपस्थित झाला आहे.