pandurang phuge, anand desai, baba shaikh, rajesh rajput, vijay rathod and raju rathod
sakal
पिंपरी - चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरात बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवसांत एकामागोमाग सात जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तर एक जण गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हातभट्टी दारूच्या सेवनामुळे हे मृत्यू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.