

जुनी सांगवी - मासिक पाळीत होणारा सॅनिटरी नॅपकिनचा वापर, त्यातून निर्माण होणारा कचरा व महिलांमधील न्यूनगंड कमी व्हावा, यासाठी सॅनिटरी नॅपकिन कचऱ्याचे विलगीकरण व्यवस्थित होण्यासाठी येथील सखी महिला बचत गटाच्या माध्यमातून ‘आरंभ’ या नावाने कागदी पिशव्यांची निर्मिती करण्यात येत आहे. या स्तुत्य उपक्रमास महिला व आरोग्यक्षेत्रातून भरभरून दाद मिळत आहे, असे या संकल्पनेच्या कर्त्या मीना शितोळे यांनी सांगितले.
काय आहे उपक्रम?
पेपर व इतर रद्दीपासून ही पिशवी तयार केली जात आहे. सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी रद्दी व प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होतो. हीच बाब लक्षात घेऊन याचा कचरा ओळखता यावा. त्यातून सर्वांनाच सुरक्षिततेची काळजी घेता यावी, यासाठी सॅनिटरी नॅपकिन वापरासाठी रद्दीपासून या कागदी पिशव्यांची निर्मिती करण्यात येत आहे. याचबरोबर कापडी पिशव्याही बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्याचे काम सुरू आहे.
महिलांना मिळाला रोजगार
लॉकडाउन काळात अनेकांना मूळ उद्योग व व्यवसाय सोडून इतर कामे करणे भाग पडले. बहुतांश लोक भाजी विक्रीकडे वळल्याने महिलांना घरबसल्या कागदी पिशव्या तयार करता याव्या ही संकल्पना पुढे आली. खरेदीसाठी वापरण्यात येणाऱ्या कापडी पिशव्या, कागदी पिशव्या यासोबतच सॅनिटरी नॅपकिन कचऱ्याची समस्या ही सुरक्षित व सुकर होण्यासाठी ‘आरंभ’ या नावाने कागदी पिशव्यांची निर्मिती करण्यात आली. ही पिशवी कचरा विलगीकरणासाठी फायदेशीर ठरत आहे. त्यावरील रेडडॉट असलेल्या स्टिकरमुळे ही पिशवी सहज ओळखता येते. यामुळे स्वच्छता कर्मचारी, कचरा विलगीकरण सुरक्षित करू शकतील. जुनी सांगवी येथे सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आरती राव, अश्विनी दरेकर, मीना शितोळे आदी महिला उपस्थित होत्या.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सद्यःस्थिती काय?
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.