शुल्कवाढ विरोधात पुणे जिल्ह्यातील 'या' ३७ शाळांविरूद्ध पालकांनी तक्रार केलीय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

लॉकडाउन काळात शुल्कासाठी शाळांनी पालकांवर दबाव आणू नये, असे स्पष्ट आदेश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

पिंपरी : लॉकडाउन काळात शुल्कासाठी शाळांनी पालकांवर दबाव आणू नये, असे स्पष्ट आदेश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. शुल्कवाढीविरोधात तक्रार निवारण कक्ष स्थापन केला. तरीही संस्थाचालकांकडून बिनदिक्कतपणे शुल्कवाढ आणि ऑनलाइन क्‍लाससाठी जबरदस्ती करण्यात येत असल्याने पुणे जिल्ह्यातील 37 शाळांविरोधात पालकांनी थेट ऑनलाइन तक्रारी केल्या आहेत. यातील काही शाळांना नोटीसा बजावल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पुणे जिल्ह्यात पाच हजार 550 शाळा असून, त्यापैकी तीन हजार 650 प्राथमिक आणि एक हजार 900 माध्यमिक शाळा आहेत. लॉकडाउनमध्ये पालकांचे आर्थिक उत्पन्न कमी झाले असतानाच खासगी शाळा चालवणारे संस्थाचालक आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत पालकांकडे शुल्कासाठी तगादा लावत आहे. ई-मेल, एसएमएस अथवा गृहभेटीद्वारे ही अनेक शाळा शुल्कासाठी पालकांना वैतागून सोडले आहे. या इंग्रजी शाळा संबंधी पालकांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी शासनाच्या ट्‌विटरवर पुणे जिल्ह्यासाठी तक्रार निवारण कक्ष व हेल्पलाइन सुरू केली आहे. पुणे महापालिका अखत्यारीतील कोथरूड, कोंढवा, हडपसर, ढोले पाटील रोड, येरवडा, भवानी पेठ या परिसरातील 15 शाळांविरोधात तक्रार प्राप्त झाल्या आहेत. मात्र, तक्रार निवारण अधिकारी धनंजय परदेशी यांनी मोजक्‍याच शाळांची नावे दिली, उर्वरित शाळांची नावे देण्यास स्पष्ट नकार दिला. पिंपरी चिंचवड शहरातून 13 शाळांविरोधात तक्रारी आल्याचे पर्यवेक्षक विलास पाटील यांनी सांगितले. त्यातील चार शाळांच्या तक्रारी सोडविल्या. ग्रामीण भागातील आठ शाळांविरोधात विविध कारणांसाठी तक्रार केल्याची माहिती ज्योती परिहार यांनी दिली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमच्याकडे तक्रार करा 

पुणे विभागात उपशिक्षणाधिकारी ज्योती परिहार (पुणे ग्रामीण प्राथमिक) 8888225364, सुधाकर पाखरे - 9822510618 (माध्यमिक), पुणे मनपासाठी धनंजय परदेशी -9404609170, पिंपरी चिंचवडसाठी पर्यवेक्षक विलास पाटील 8007804777 यांची नियुक्ती तक्रार निवारणासाठी केली आहे. शाळा जबरदस्तीने शुल्क मागत असल्यास या क्रमांकावर पालकांनी तक्रार करा. 

या शुल्कवाढ विरोधात तक्रारी प्राप्त शाळा 

 1. आरबीज स्कूल, मुंढवा 
 2. व्हिबग्योर स्कूल, हिंजवडी 
 3. सेंट मॅथ्यू ऍकॅडमी उरळी देवाची
 4. चैतन्य स्कूल वाघोली
 5. अश्‍विनी इंटरनॅशनल स्कूल, मारूंजी 
 6. ब्लॉसम पब्लिक स्कूल, ताथवडे 
 7. लेकसिकॉन स्कूल, वाघोली
 8. ब्लॉसम पब्लिक स्कूल, नऱ्हे 
 9. व्हिबग्योर स्कूल, महंमदवाडी (पुणे ग्रामीण) 
 10. एसएनबीपी स्कूल, मोरवाडी (तक्रार निवारण) 
 11. एसएनबीपी स्कूल, रहाटणी (तक्रार निवारण) 
 12. न्यू पूना पब्लिक आकुर्डी
 13. रसिकलाल माणिकचंद धारिवाल स्कूल, वाल्हेकरवाडी 
 14. व्हिबग्योर स्कूल, पिंपळे सौदागर (दोनवेळा नोटीस बजावली) 
 15. जयहिंद स्कूल पिंपरी (तक्रार निवारण केली) 
 16. एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवडगाव (नोटीस बजावली) 
 17. डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूल, महात्मा फुले नगर पिंपरी, (तक्रार निवारण) 
 18. साधू वासवानी स्कूल, मोशी (तक्रार निवारण) 
 19. होली स्कूल, पिंपळे सौदागर 
 20. बचपन स्कूल दिघी 
 21. ऑर्रचिड स्कूल, निगडी प्राधिकरण 
 22. युरो किड्‌स स्कूल, चिंचवड (पिंपरी चिंचवड) 
 23. एन. के.एस. कोठारी स्कूल, कोंढवा 
 24. एन.आय.बी.एम स्कूल, मगरपट्टा 
 25. व्हिबग्योर स्कूल, मगरपट्टा 
 26. विजयवल्लभ स्कूल, भवानी पेठ (तक्रार निवारण केले) 
 27. युरो स्कूल उंड्री 
 28. मेंटॉर स्कूल, मगरपट्टा (पुणे शहर) 

आकडे बोलतात 

 • महापालिका क्षेत्र / शाळांची संख्या 
 • पुणे शहर / 15 
 • पुणे ग्रामीण/9 
 • पिंपरी चिंचवड / 13

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parents complaints against 37 schools in pune district due increase in fees